News & Event

 • News
 • Event

  MMRCL celebrates National Safety Week

The Hitavada,  15 Mar 2019
  महा मेट्रोचे प्रदर्शन ठरले शहरातले मुख्य आकर्षण, ५ दिवसात २३ हजार आबालवृद्धांनी दिली भेट

Star Maharashtra,  14 Mar 2019

नागपूर : नागपूरकरांची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आणि नागपुरात माझी मेट्रो धावू लागली. नागपुरात होत असलेला हा विकास नागपूरकरांनी डोळ्याने पाहिला असला तरीही यातले बारकावे, बांधकामाची विशेषता, प्रकल्पाचे महत्व, वैशिष्ट्ये जाणून घ्यायला प्रत्येकजणच उत्सुक होता. त्यांच्या या उत्सुकतेचे शमन करण्यासाठी महा मेट्रो नागपूरतर्फे प्रकल्प उदघाटनाच्या दिवसापासूनच प्रकल्पाचे सर्व वैशिष्ट्ये नागरिकांपर्यंत पोचवण्याचा उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ५ दिवस सुरु असलेल्या या प्रदर्शनाला एकूण २३००० लोकांनी भेट दिली. दिनांक ११ मार्च सोमवार रोजी प्रदर्शनाची सांगता करण्यात आली. शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय विभाग, सामाजिक संघटना आणि संस्थेनी भेट दिली. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या अनेक इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात्मक दृष्टीने प्रदर्शनीचे अवलोकन केले आधुनिक बांधकाम, डिजाईन, अंतरसज्जा ह्या केवळ देखाव्यासाठी नसून भविष्यातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून अभ्यासात्मक दृष्टीने फायद्याचे ठरत असल्याचे मत यावेळी या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. दत्त मेघे एमबीए कॉलेज, रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, आय.टी.आय. महाविद्यालय, रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, सेंट व्हिन्सेंट पलोटी यासारख्या अनेक महाविद्यालयांनी शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनीत लावलेल्या माहितीच्या नोंदी घेतल्या. संपूर्ण शहरातून आपल्या पाल्यांना प्रदर्शन दाखवण्यासाठी पालकांची गर्दी येत राहिली. लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी ठेवण्यात आलेल्या मोबाइक तसेच सायकल चालवून लोकांनी आनंद व्यक्त केला. दिल्ली बंगलोर येथून आलेल्या काही व्यवसायिक प्रतिनिधींनी प्रदर्शनाला विशेष भेट दिली आणि प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊन प्रकल्पाच्या कार्याबद्दल कौतुकास्पद प्रतिक्रिया व्यक्त केली. महामेट्रो नागपूर प्रकल्पात आतापर्यंत झालेल्या कार्याचा सविस्तर तपशील मॉडेल स्वरूपात प्रदर्शनीत सादर करण्यात आला होता. प्रदर्शनात येणाऱ्या नागरिकांना प्रकल्पात झालेल्या आणि निर्माणाधीन कार्याची मौखिक आणि व्हिडिओद्वारा माहिती देण्यात येत होती. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे त्यांना विशिष्ट डिपार्टमेंटच्या अधिकार्यांद्वारा देण्यात येत होती. यावर शहरात होत असलेले आंतराष्ट्रीय स्तरीय स्थापत्य, आधुनिक बांधकाम, पर्यावरण संवर्धनासाठी होणारे सर्वस्तरीय प्रयत्न, सौर ऊर्जा संकल्पना, प्रॉपर्टी डेव्हलोपमेंटचे विविध मॉडेल, चारस्तरीय वाहतूक योजना अश्या विविध कार्यप्रयोजनाची माहिती मिळण्यासाठी नेहमीच अश्या प्रदर्शनीचे आयोजन शहरात वेळोवेळी होत राहावे अशी इच्छा प्रदर्शनाच्या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केली.नागरिकांनी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या कलाकृतीसह सेल्फी काढून सोशल मीडियावर जिकडे तिकडे प्रदर्शित केले

  PM modi to flag off Metro today

Lokmat Times , 7 Mar 2019
  Making of Mazi Metro

Time Of India 7 Mar 2019  PM to inaugurate Nagpur Metro tomorrow

Lokmat Times,  6 Mar 2019  PM to inaugurate Nagpur Metro tomorrow

Indian express, Mumbai 6 Mar 2019
  March 7,2019: city's date with Mazi Metro

Times of India,  5 Mar 2019

  CMRS 3 member team inspects metro rail

The Hitavada,  4 Mar 2019  सीएमआरएसने केली मेट्रो प्रकल्पाची पाहणी

Star Maharashtra,  4 Mar 2019

नागपूर : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) तर्फे आज ३ मार्च रोजी महा मेट्रो नागपूर प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. 'सीएमआरएस'च्या तीन सदस्यीय पथकाचे नेतृत्व रेल्वे सुरक्षा आयुक्त अरविंद कुमार जैन यांनी केले असून यांच्या सोबत रेल्वे सुरक्षा उपायुक्त जी. पी. गर्ग व इ. श्रीनिवासन उपस्थित होते. दिवस भर चाललेल्या या पाहणी दौऱ्यात महा मेट्रोचे व्यवस्थपकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याची प्रगती आणि प्रकल्पाबद्दल महत्वाची माहिती सीएमआरएस अधिकाऱ्यांना दिली. तत्पूर्वी सविस्तर माहितीसाठी मेट्रो अधिकाऱ्यांतर्फे ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन सादर करण्यात आले होते. यानंतर सर्व प्रथम सीएमआरएसने मिहान येथील डेपो'चा दौरा केला. याठिकाणी सीएमआरएस अधिकाऱ्यांनी महत्वाच्या कागदपत्रांची पाहणी करून रोलिंग स्टॉकचे निरीक्षण केली. यात मेट्रोच्या इमर्जन्सी फ्रंट डोअर इव्हॅक्यूव्हेशन, आणि सुरक्षा उपकरणांसह कोचेससंबंधित इतर सर्व उपकरणांची तपासणी केली. डेपोत उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी अरविंद कुमार जैन यांनी सविस्तर चर्चा करून माहिती जाणून घेतली आहे. येथे सीएमआरएस अधिकाऱ्यांनी मेट्रो अधिकाऱ्यांसोबत वृक्षरोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांना दिला. यानंतर अनुक्रमे एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन, एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि इंटरचेंज मेट्रो स्टेशनची पाहणी केली. प्रवासी सेवेसाठी स्टेशनचे बांधकाम, स्टेशनवर लावण्यात आलेले आटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेट्स, अग्निरोधक उपाय, एस्केलेटर, लिफ्ट, विद्युत उपकरणे, टेलिकॉम, आपातकालीन यंत्रणा व इतर सर्व सोयी सुविधांची पाहणी सीएमआरएसने केली. दरम्यान एयरपोर्ट स्टेशनवर मॉकड्रिल सादर करण्यात आले. आपातकालीन परिस्थीत मेट्रोचे अधिकारी उत्तमरीत्या कार्य करत असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण मॉकड्रिलच्या माध्यमातून देण्यात आले. सीएमआरएस पथकाने इंटरचेंज स्टेशन ते साऊथ स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास केला. ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित ब्रेक, आसन व्यवस्था, डिजीटल स्क्रीन, निर्गमन गेट, सवांद कायम ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या उपकरणांची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. या संपूर्ण दौऱ्यासाठी महा मेट्रो नागपूर प्रकल्पाचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक अँड सिस्टीम्स) सुनील माथूर, कार्यकारी संचालक(रोलिंग स्टॉक) जनक कुमार गर्ग, कार्यकारी संचालक(वरिष्ठ मुख्य प्रकल्प अधिकारी) देवेंद्र रामटेककर, व्ही के अग्रवाल, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मेट्रोच्या प्रवासी सेवेसाठी आवश्यक दोन्ही महत्वाच्या चाचण्या यशवस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. आरडीएसओ'ने केलेल्या पाहणी नंतर आरडीएसओ'चे प्रमाणपत्र देखील महा मेट्रोने मिळवले आहे. तर आज सीएमआरएसने केलेल्या पाहणीनंतर आता सीएमआरएस प्रमाणपत्र मिळताच प्रवाश्यांना मेट्रोतुन प्रवास करता येणार आहे.
  Metro rail rakes reach Hingna depot

The Hitavada,  2 Mar 2019Dr. Brijesh Dixit, MD Maha Metro gave a special industry presentation on “Innovations in Metro Rail in India” at the 7th Annual Metro Rail India Summit 2018 held on 21st March 2018 at New Delhi. It was organized by ITP Media Group (India) and Construction Week magazine.


Nagpur Metro celebrated it's 3rd foundation day at Palacio Hall, hotel centre point, Nagpur on 17th February 2018


Investor Meet held at Chitanvis Center on 08 Dec 2017


The French Embassy in India will also organize the third edition of 'Bounjour India' an Indo-French platform for innovation and creativity on 29/04/2017


In the presence of Hon. Dr. E. Sreedharan Metro Man ‎NMRCL‬ celebrated its 1st Foundation Day on 18th feb 2016